आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ! लै गर्दी होती आज शिर्डीत

| Updated on: Jun 11, 2022 | 7:15 PM

शिर्डीत भाविकांनी लाखोंच्या संख्येनं गर्दी केलीये. कोरोना महामारीत फिरणं अशक्य होतं. आता शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि त्यात वीक एन्ड त्यामुळे लाखो भाविक आज शिर्डीत दर्शनासाठी उपस्थित होते.

शिर्डी: राज्यात 13 जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे लोकांना जितकं शक्य होईल लोकं तितकं फिरून घेतायत आणि त्यात शनिवार रविवार म्हटल्यावर तर काय विचारायलाच नको. शिर्डीत (Shirdi) भाविकांनी लाखोंच्या संख्येनं गर्दी केलीये. कोरोना महामारीत फिरणं अशक्य होतं. आता शाळांच्या (Schools) उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि त्यात वीक एन्ड त्यामुळे लाखो भाविक आज शिर्डीत दर्शनासाठी उपस्थित होते. मंदिर (Temple) पुन्हा सुरु झाल्यापासून 64 लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीत हजेरी लावलीये. इतर दिवशी ही संख्या हजारोंच्या असते. आज एका दिवसात ही संख्या लाखात होती.

Published on: Jun 11, 2022 07:09 PM
“आम्ही मतं दिली ते सगळे निवडून आले”, हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया
Dhananjay Mahadik यांचा मुलगा बापाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला