Lalbaugcha Raja 2024 : ‘तेव्हा बाप्पामध्ये जिवंतपणा येतो…’, लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कांबळींनी सांगितला अनुभव
लालबागमध्ये गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता सर्वजण येत असतात. सामान्य नागरिकांपासून बॉलीवूड सेलिब्रिटी आणि अंबानी कुटुंबातील लोक लालबागच्या राजाचं आवर्जून दर्शन घेतात. या 10 दिवसांच्या उत्सवात संपूर्ण मुंबई शहर बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसते. बघा लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कांबळींसोबत खास संवाद
लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होण्यास अवघे काही दिवस उरले आहे. घरोघरी, गणेशोत्सव मंडळात बाप्पाचं आगमन होणार आहे. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण असून मुंबईत 10 दिवस भव्य गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवातील आकर्षणाचे मुख्य केंद्र म्हणजे लालबागचा राजा, ज्याची कीर्ती देशातच नाही तर परदेशातही आहे. गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर लालबागमध्ये स्थापन केलेल्या गणपती बाप्पाच्या भव्य मूर्तीची विशेष पूजा केली जाते. या 10 दिवसांच्या उत्सवापासून ते विसर्जनापर्यंत लालबागमध्ये भव्य-दिव्य उत्सवाचे आयोजन पाहायला मिळते. मुंबईतील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध गणेश मंडळ म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी राज्यातून परदेशातूनही भाविक दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. कोळी समाजातील मच्छिमारांनी लालबागमध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. या बाप्पाची 18-20 फूट उंचीची मूर्ती बोलकी असल्याने सर्वच भाविकांची ती लक्ष वेधून घेते. जवळपास 89 वर्षांपासून बाप्पाची ही सुंदर मूर्ती घडवण्याची जबाबदारी कांबळी कुटुंबीय सांभाळत आहेत. राजाची मूर्ती घडवणारी ही तिसरी पिढी असून बघा या राजाची मूर्ती घडवणाऱ्या संतोष कांबळींसोबत केलेला खास संवाद