लेकींनी डॉक्टर करण्यासाठी बापाने होती तीही जमिन विकली
सूर्यकांत कांबळे यांनी आपली मुलगी सुनिताच्या पुढील शिक्षणासाठी त्यांनी जी काही थोडीफार जमीन होती ती विकून आता सुनिताचा प्रवेश नांदेज मेडिकल कॉलजेसाठी केला जाणार आहे.
सूर्यकांत कांबळे यांनी आपली मुलगी सुनिताच्या पुढील शिक्षणासाठी त्यांनी जी काही थोडीफार जमीन होती ती विकून आता सुनिताचा प्रवेश नांदेज मेडिकल कॉलजेसाठी केला जाणार आहे. अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या सूर्यकांत कांबळे यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी बाप म्हणून ते कधी जिद्द हरले नाहीत. आणि त्यांच्या या जिद्दीला त्यांच्या मुलीनीही साथ दिली आहे. म्हणूनच बारावीनंतर सुनिता कांबळे यांनी मेडिकलसाठी प्रवेश मिळाला आहे. मेडिकलला प्रवेश मिळाल्यानंतर सुनिताने आपल्या यशाचे सगळे श्रेय आपल्या आई वडिलांना दिले आहे. मेडिकलसाठी सूर्यकांत कांबळे यांच्या भावाच्याही मुलीला प्रवेश मिळाला आहे. प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलीनी टीव्ही 9 बरोबर सांगितले की, आमच्या वडिलांच्यामुळे पुढील शिक्षण घेणे शक्क झाले आहे.