Pune | भोरमध्ये कोंढरी गावाजवळ दरड कोसळली, प्रशासनाकडून संपूर्ण गावाचं स्थलांतर
मुसळधार पावसाने पुण्यातील भोर तालुक्याच्या कोंढरी गावाजवळ दरड कोसळलीय. त्यामुळे प्रशासनानं संपूर्ण गाव स्थलांतरित केलं. दरड कोसळल्यानं कोंढरी गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले आहेत.
पुणे : मुसळधार पावसाने पुण्यातील भोर तालुक्याच्या कोंढरी गावाजवळ दरड कोसळलीय. त्यामुळे प्रशासनानं संपूर्ण गाव स्थलांतरित केलं. दरड कोसळल्यानं कोंढरी गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले आहेत. अतिवृष्टीनं भोर महाड रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भुस्खलन झालंय. 30 ठिकाणी दरड कोसळल्यानं भोर महाड रस्ता संपूर्ण बंद झाला आहे. (Landslide at Kondhari village in Bhor, village was evacuated)
कोंढरी गावात मोबाईल नेटवर्क नसल्यानं नागरिकांचा कोणाशीही संपर्क नाही. गावातील 300 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. दरडी कोसळल्यानं रस्त्यावर अक्षरशः दगडांचा खच पडलाय. डोंगरावरून झाडं रस्त्यावर आलीत. त्यामुळे आणखी 5 दिवस रस्ता मोकळा करण्यासाठी लागणार आहे.
सरकार कोंढरी गावचे तळीये-माळीण होण्याची वाट पारतंय का? : आमदार संग्राम थोपटे
आमदार संग्राम थोपटे यांनी कोंढरीतील परिस्थितीवरुन सरकारवर हल्लाबोल केलाय. शासन कोंढरी गावचं तळीये किंवा माळीण होण्याची वाट पहात आहे का? असा सवाल संग्राम थोपटे उपस्थिती केला.
पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत
अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यालाही मोठा फटका बसलाय. मुसळधार पावसानंतर भोर तालुक्यातील 12 गावं अंधारात गेलीत, तर 7 गावांचा संपर्क तुटलाय. याशिवाय डोंगराला भेगा पडल्याने शेजारील संपूर्ण कोंढरी गावाचं स्थलांतर केलंय. या गावातील सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
घाटमाथ्यावर सलग पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोंढरी गावात सलग 3 वर्षांपासून भुस्खलन होत आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा गावातील 40 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
हेही वाचा :
राज्यात पुराचं संकट, यंदा माझा वाढदिवस साजरा करू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
केंद्राकडून महाराष्ट्राला मदत, एनडीआरएफची 26 पथकं, हवाईदलाचे 4 हेलिकॉप्टर्ससह लष्करही दाखल
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, वेगवेगळ्या घटनांमध्ये 89 जणांनी जीव गमावला, कुठे किती मृत्यू?
(Landslide at Kondhari village in Bhor, village was evacuated)