Kasara Ghat | कसाऱ्यात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द
कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.
मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला. विशेष म्हणजे रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला आहे. कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.
सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी-लातूर स्पेशल, सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल, सीएसएमटी-हजूर साहेब नांदेड स्पेशल या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही ट्रेन अर्ध्यावर थांबवण्यात आल्या आहेत, तर ट्रेनचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
2111 कल्याण अमरावती एक्सप्रेस (डाऊन) खर्डी स्थानकात थांबली होती, आता ही ट्रेन मुंबईच्या दिशेने परत येणार आहे. हावडा एक्सप्रेस आसनगाव रेल्वे स्थानकात, तर सिद्धेश्वर एक्सप्रेस बदलापूरला थांबली आहे.