VIDEO : Goregaon | ही शाखा आहे, इथे लोकांना न्याय मिळायला पाहिजे, हे न्यायालय असले पाहिजे: Raj Thackeray
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका येथील मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शाखेचं काम कसं असावं याचं मार्गदर्शन करतानाच मनसे सैनिकांना त्यांनी जाहीपणे तंबीच दिली. या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळाला पाहिजे असा लोकांना विश्वास वाटला पाहिजे. ही शाखा आहे दुकान नाही, अशी तंबीच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका येथील मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शाखेचं काम कसं असावं याचं मार्गदर्शन करतानाच मनसे सैनिकांना त्यांनी जाहीपणे तंबीच दिली. या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळाला पाहिजे असा लोकांना विश्वास वाटला पाहिजे. ही शाखा आहे दुकान नाही, अशी तंबीच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शाखा बांधणीपासून ते विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज साकीनाक्यात मनसेने शाखेची स्थापना केली आहे. साकीनाक्यात मनसेचं वर्चस्व होतं. मात्र, काही नगरसेवक शिवसेनेत गेल्याने मनसेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे साकीनाक्यात पुन्हा एकदा मनसेने मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत आहे.