लता दीदींचं स्वप्न मविआ सरकार पूर्ण करणार - Uday Samant

लता दीदींचं स्वप्न मविआ सरकार पूर्ण करणार – Uday Samant

| Updated on: Feb 07, 2022 | 7:41 PM

दिनानाथ मंगेशकर नावाने आंतराष्ट्रीय संगीत महाविद्यालय त्यांना उभं करायचं होतं. त्यांना आदरांजली म्हणून दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने आंतराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काहीच दिवसात सुरु केलं जाणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

गोवा : आठवणीत तर अख्खं जग लता दिदींना ओळखायचं. गानसम्राज्ञी म्हणून त्यांनी मोठं प्रस्थ निर्माण केलं होतं. दिदींच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीय. माझा वाढदिवस असो किंवा त्यांचा वाढदिवस मी त्यांच्याशी फोनवर बोलायचो. त्यांचे जे स्वप्न आहे दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरु करावे. त्याचा मंत्री म्हणून मी पाठपुरावा करत होतो. अनेक वेळा फोन करून मला आर्शिवाद दिले होते. दिनानाथ मंगेशकर नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय त्यांना उभं करायचं होतं. त्यांना आदरांजली म्हणून दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काहीच दिवसात सुरु केलं जाणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Published on: Feb 07, 2022 07:28 PM
Bhiwandiमध्ये कपड्याच्या चिंध्या साठवलेल्या गोदामाला भीषण आग, 3 गोदामं जळून खाक
Sadabhau Khot गोव्याच्या निवडणूक रिंगणात | Goa Election | Sadabhau Khot At Goa