मी शब्दात भावना मांडू शकत नाही, लतादीदींच्या निधनावर PM Modi यांचं ट्विट – Lata Mangeshkar Death

| Updated on: Feb 06, 2022 | 10:56 AM

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली आहे.

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र रविवारी सकाळी 8.12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त देशच नाही, तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे.

Published on: Feb 06, 2022 10:48 AM
Lata Mangeshkar अमर आहेत, युग संपले, Sanjay Raut यांचं ट्विट
VIDEO : Lata Mangeshkar यांच्या निधनानं 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर – Lata Mangeshkar Death