विलासरावांचं नाव घेताच रितेश देशमुख ढसाढसा रडला, ‘त्या’ किस्स्यानं देशमुख परिवार गहिवरला
बऱ्याच दिवसांनी विलासराव देशमुखांच्या लातुरातील एक कार्यक्रम काँग्रेससाठी उत्साह वाढवणारा ठरला. सतेज पाटलांपासून ते विश्वजीत कदम यांच्यापर्यंत अनेकांनी मंच गाजवला आणि देशमुख बंधूंसह इतर नेत्यांबद्दल ज्या चर्चा सुरू होत्या त्याला या नेत्यांनी पूर्णविराम दिला.
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : लातुरमध्ये दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. या निमित्ताने भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळत देशमुख बंधूंसह काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. काका-पुतण्याच्या नात्यांवर रितेश देशमुख चांगलाच भावूक झाला. तर तरूण नेत्यांनी एकजूटीचं आवाहन केलंय. बऱ्याच दिवसांनी विलासराव देशमुखांच्या लातुरातील एक कार्यक्रम काँग्रेससाठी उत्साह वाढवणारा ठरला. सतेज पाटलांपासून ते विश्वजीत कदम यांच्यापर्यंत अनेकांनी मंच गाजवला आणि देशमुख बंधूंसह इतर नेत्यांबद्दल ज्या चर्चा सुरू होत्या त्याला या नेत्यांनी पूर्णविराम दिला. सर्वाधिक चर्चेत ठरलं ते रितेश देशमुख यांचं भाषण… विलासरावांच्या आठवणींना उजाळा देताना रितेश देशमुख यांनी काका दिलीपराव देशमुख यांचं उदाहरण देत सध्या गाजत असलेल्या काका-पुतण्यांच्या नात्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले. बघा रितेश देशमुख नेमकं काय म्हणाले अन् त्यांना अश्रू अनावर झाले…