Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर व्हेटिलेटरवर, तब्बेतीची चिंता! दिग्गजांकडून विचारपूस
Singer Lata Mangeshkar Health News : आशा भोसले यांनी देखील रुग्णालयात जाऊत लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. दुपारी डॉक्टरांनीही मेडिकल बुलेटिन जारी करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
लता मंगेशकर यांच्यात प्रकृतीतबाबत महत्त्वाची बातमी हाती येतेय. दुपारी राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनीही लतादीदींच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्यामुले लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, आता लता मंगेशकर यांच्या धाकटी बहीण आशा भोसले यांनी देखील रुग्णालयात जाऊत लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. दुपारी डॉक्टरांनीही मेडिकल बुलेटिन जारी करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. तर हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी सकाळीच त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली होती. गेल्या 28 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रिज कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.