कोथिंबीरीनं शेतकऱ्याचं नशीब पालटलं, लखपती शेतकऱ्याची बघा भन्नाट यशोगाथा

| Updated on: Jul 30, 2023 | 3:24 PM

VIDEO | कोथिंबीरीच्या उत्पादनातून कोटींची कमाई, लातूरच्या शेतकऱ्याची यशोगाथा ऐका त्याच्याच तोंडून... म्हणाले, 'लातुरात ५० लाखांचे घर, फिरायला २५ लाखांची गाडी, मुलांचे उच्च शिक्षण असं सगळं काही कोथिंबिरीच्या कृपेने झाले'

लातूर, 30 जुलै 2023 | राज्यभर टॉमेटोची चर्चा होत असताना लातूर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याला कोथिंबीरीने लखपती बनवले आहे . अवघ्या ३५ दिवसांच्या या पिकाने पाच एकरात १६ लाख रुपयांची कमाई झाली आहे . औसा तालुक्यातल्या आशीव येथील रमेश वळके असं या शेतकऱ्याचं नाव आहे . गेल्या पाच वर्षात त्यांनी एक कोटी रुपये कोथिंबीरीच्या उत्पादनात मिळवले आहेत. त्यांच्याकडे एकूण वीस एकर जमीन आहे , त्यापैकी पाच एकरावर ते दरवर्षी कोथिंबीरीचे उत्पादन घेतात . गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या कोथिंबिरीचा प्लॉट १६ लाख ३६ हजार रुपयांना विकला असल्याचे त्यांनी सांगितले. कोथिंबिरीच्या कृपेने त्यांची जीवन पद्धती बदलली आहे. लातुरात ५० लाखांचे घर, फिरायला २५ लाखांची गाडी, मुलांचे उच्च शिक्षण असं सगळं काही कोथिंबिरीच्या कृपेने झाले आहे . कमी खर्चात हमखास उत्पादन देणाऱ्या या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे असा त्यांचा आग्रह आहे.

Published on: Jul 30, 2023 03:24 PM
“उद्धव ठाकरे मौलाना”, नितेश राणे यांची जहरी टीका!
‘आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे का नव्हते?’ संजय शिरसाट यांचा सवाल