Mumbai | आज बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, जांभोरी मैदान परिसराला छावणीचे स्वरुप
मुंबईतील ऐतिहासिक वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा आज शुभारंभ होणार आहे. सरकारकडून पुनर्विकास करण्यात येणारा हा मोठा प्रकल्प आहे. बीडीडी चाळीतील जांभोरी मैदान परिसराला एखाद्या छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय. रस्त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत तिन्ही पक्षाचे झेंडे लावून बॅनरने, फुलांनी हा परिसरात सजवण्यात आलाय.
मुंबईतील ऐतिहासिक वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा आज शुभारंभ होणार आहे. सरकारकडून पुनर्विकास करण्यात येणारा हा मोठा प्रकल्प आहे. बीडीडी चाळीतील जांभोरी मैदान परिसराला एखाद्या छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय. रस्त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत तिन्ही पक्षाचे झेंडे लावून बॅनरने, फुलांनी हा परिसरात सजवण्यात आलाय. भव्य असा पेंडॉल तयार करण्यात आलाय. धुराची फवारणी केली जातेय. बॅनरवर विकासाचा आराखडा कसा असेल त्याची छायचित्रही लावण्यात आलीयेत. बीडीडी चाळीतील जे कुटूंब अपात्र ठरलेयत त्यांनी या प्रकल्पाला विरोध केलाय, त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घटू नये यासाठी अतिरिक्त पोलिसांची कुमकही मागवण्यात आलीये.