महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवरून जयंत पाटील vs देवेंद्र फडणवीस, सभागृहातच खडाजंगी

| Updated on: Dec 21, 2023 | 12:35 PM

विरोधकांसह जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक दंगे झाल्याचा आरोप केला. बीडमधील जाळपोळीवेळी एसपी हे फोन बंद करून बसले होते. हे जिल्हाधिकाऱ्यांच्या रिपोर्टमधून समोर आल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. गुन्हेगारीच्या एनसीआरबीच्या आकडेवारीवरून सवाल जवाब झालेत

मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यस्थेवरून विरोधकांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आकडेवारीचे दाखले देत विरोधकांनी विविध मुद्दे मांडलेत याला विधानपरिषदेत फडणवीस यांनी उत्तरं दिलीत. विरोधकांसह जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक दंगे झाल्याचा आरोप केला. बीडमधील जाळपोळीवेळी एसपी हे फोन बंद करून बसले होते. हे जिल्हाधिकाऱ्यांच्या रिपोर्टमधून समोर आल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. गुन्हेगारीच्या एनसीआरबीच्या आकडेवारीवरून सवाल जवाब झालेत. राज्यातील गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था यावरून जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. आम्ही रामाला मानणारे आहोत. पण सीता असुरक्षित नको, असे म्हणत सभागृहात महिला सुरक्षेवर प्रश्न उत्तरं झालीत. तर अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांनी विदर्भाचे मुद्दे का दिले नाहीत? यावरूनही टोलेबाजी झाली.

Published on: Dec 21, 2023 12:35 PM
RSS चं बौद्धिक शिबीर, एकनाथ शिंदे यांचं संघावर ‘लक्ष’ अन् अजित दादा ‘दक्ष’
मुख्यमंत्री शिंदे यांच्या टार्गेटवर ठाकरे पिता-पुत्र ; म्हणाले, चाहिए खर्चा… निकालो मोर्चा