Salman Khan threat : लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला पुन्हा धमकी, ‘…अन्यथा बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल’

| Updated on: Oct 18, 2024 | 10:29 AM

गेल्या काहीच दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना अनेक खुलासे उघड होतायत. यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असल्याची माहिती समोर आली. अशातच पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकी देण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळतेय. बिश्नोई गँगसोबतचा वाद मिटवण्यासाठी तब्बल ५ कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. सलमान खानने ५ कोटी रूपये इतके पैसे दिले नाही तर बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल, अशी थेट धमकीच बिश्नोई गँगकडून सलमान खानला देण्यात आली आहे. याप्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपद्वारे सलमान खानच्या धमकीचा मेसेज मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दीर्घकाळापासून सुरू असलेले वैर संपवण्यासाठी सलमान खानकडे ५ कोटींची मागणी करणारा धमकीचा हा मेसेज मुंबई ट्राफिक पोलिसांना मिळालाय. हा मेसेज लॉरेन्स गँगचा सदस्याकडून पाठवल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवलेल्या या मेसेजमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  ‘लॉरेन्स बिश्नोईसोबतचं वैर संपवण्यासाठी समलान खानने ५ कोटी रूपये द्यावे. हा मेसेज हलक्यात घेऊ नका, अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षा खूप वाईट होईल’, असा इशाराही या धमकीच्या मेसेजमध्ये देण्यात आला.

Published on: Oct 18, 2024 10:29 AM
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार, जरांगे पाटील याचं वक्तव्य
Ladki Bahin Yojana : महिलांनो… लाडकी बहीण योजनेचे नियम मोडून पैस घेतले? डिसेंबरनंतर अर्जाची तपासणी अन् होणार वसुली?