बदलापूरच्या आरोपीला ‘वेडा’ दाखवून वाचवण्याचा प्रयत्न अन्…, वकील असीम सरोदेंचा मोठा आरोप

| Updated on: Aug 26, 2024 | 5:14 PM

आजच्या न्यायालयातील युक्तिवादात वकील असीम सरोदे मुलीच्या जबाबाची वैधता, पोलिसांच्या तपासातील त्रुटी आणि न्यायप्रक्रियेत येणाऱ्या अडचणींची माहिती न्यायालयाला दिली. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि दोषारोपनाच्या प्रक्रियेत न्याय मिळावा, या उद्देशाने वकील असीम सरोदे बदलापुरातील पीडित मुलीची बाजू मांडणार आहेत

Follow us on

बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पीडित कुटुंबीयांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी कल्याण न्यायालयात वकील असीम सरोदे यांनी वकीलपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात कल्याण बार कौन्सिलने देखील मोफत न्यायालयीन लढा लढण्यासाठी वकीलांची नियुक्ती केली आहे. या प्रकरणात न्यायालयात आलेल्या परिस्थितीवर वकील सरोदे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना चुकीचे आणि अपूर्ण कलम लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. वकीलांच्या टीमने सेक्शन 6 आणि 9 लागू करण्याची मागणी केली, असा दावा त्यांनी केला आहे. पोलिसांच्या तपासात गंभीर त्रुटी आहेत आणि या त्रुटींमुळे न्यायप्रक्रियेत अडथळे येत असून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. याप्रकरणी मुलीचे स्टेटमेंट चाइल्ड सायकॉलॉजिस्टने घेणे अपेक्षित होते, मात्र ते पोलिस कॉन्स्टेबलने घेतले आहे. ज्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळेच्या ताब्यात असलेल्या मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप असून, शाळेच्या व्यवस्थापनाने घटना लपवल्याचा दावा करण्यात आला आहे. सरकार आणि शाळेच्या प्रतिष्ठेला महत्त्व देताना पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात योग्य आणि कठोर कलम लागू करून आरोपीला शिक्षा मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.