मराठा भावांनो… जरांगेच्या नादी लागू नका तर…सदावर्ते यांच्या मराठा तरूणांना सल्ला

| Updated on: Feb 21, 2024 | 4:46 PM

मनोज जरांगे पाटील हे नैराश्यात आहेत. अंतरवालीत जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या अशी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी करत जरांगेंवर हल्लाबोल केलाय. मराठा समाजातील तरूणांनी आरक्षणाची लढाई सोडून द्यावी, त्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे.

Follow us on

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील हे नैराश्यात आहेत. तर अंतरवाली सराटीमध्ये जखमी झालेल्या लोकांची जबाबदारी त्यांची आहे. अंतरवालीत जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या अशी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी करत जरांगेंवर हल्लाबोल केलाय. मराठा समाजातील तरूणांनी आरक्षणाची लढाई सोडून द्यावी, त्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. आता राज्य सरकारने स्वतंत्र दिलेलं दहा टक्के आरक्षण, केंद्राने दिलेले EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षण यातील टक्केवारी बघा ८५ टक्के आहे, असे सांगत जे पदरचं आहे ते सोडून द्यायचं. ज्यावेळेस तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षणाबद्दल विचारतात त्याचा लाभ घेतात त्यावेळेस तुम्हाला इतर कोणतही दुसरं आरक्षण घेता येत नसल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. तर आताच्या कायद्यातील सेक्शन ४ चा जर अभ्यास केला तर त्यात तेच म्हटलं आहे. त्यामुळे मराठ्यांनी आरक्षणाच्या मागे लागू नये, असेही सदावर्ते म्हणाले.