वकील गुणरत्न सदावर्ते स्पष्टच म्हणाले, मराठा आरक्षण कोर्टात टिकणारच नाही, कारण…

| Updated on: Feb 20, 2024 | 6:59 PM

आता हे १० टक्क्यांच मराठ्यांचं आरक्षण न्यायालयात टिकणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं असताना वकील गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. त्यांनी थेट हे मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असा दावा केलाय.

मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासंदर्भातील एकदिवसीय अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये एकमतानं मंजूर झाला. दरम्यान, आता हे १० टक्क्यांच मराठ्यांचं आरक्षण न्यायालयात टिकणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं असताना वकील गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. त्यांनी थेट हे मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असा दावा केलाय. तर मराठा समाज आर्थिक मागास, पण सामाजिक नाही. हे सरकार निष्ठुर आहे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर टीका केली. तर आज विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर केलं. मात्र, हे विधेयक संवैधानिक नाही. भारतीय राज्यघटनेच्या मुल्यांना पायदळी तुडवणारी हजारो वर्षांपासून सुरू असलेली ही गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीला तसंच ठेवणारं हे विधेयक आहे. त्यामुळंच या विधेयकामुळं आता सर्व जातीतील गुणवंतांची कत्तल होणार आहे, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले

Published on: Feb 20, 2024 06:58 PM
छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र फिरून आग लावली अन्.. शिंदेंच्या आमदारांचा हल्लाबोल काय?
तर सोन्याहून पिवळं होईल म्हणत उद्धव ठाकरे यांनी मानले एकनाथ शिंदे यांचे आभार