लक्ष्मण हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला…

| Updated on: Sep 24, 2024 | 10:30 AM

छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले असता त्यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकारला त्यांची मागणी मान्य करण्याचं आवाहन करत त्यांच्या पाठिशी असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले असता त्यांची छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेतली आहे. तर सरकारने मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करावी, असं देखील छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे त्याच परिसरात दुसरं आंदोलन सुरू झाल्याचं म्हणत लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावरूनही त्यांनी भाष्य केले आहे. तर ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी संभाजी राजे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके हे आक्रमक बनले आहेत. एकीकडे ९६ कोळी, ९२ कोळी म्हणायचं आणि दुसरीकडे मागासवर्गीयांचं आरक्षण मागायचं हे चालणार नाही, असं हाके यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी येथे मराठ्यांना आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी उपोषण सुरू आहे. तर इथून दीड किलोमीटरवर वडीगोद्री येथे नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. त्यावरूनही संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानतंर तिथे दुसरं आंदोलन सुरू झाल्याचा आरोप केलाय. बघा स्पेशल रिपोर्ट काय म्हणाले छत्रपती संभाजी राजे?

Published on: Sep 24, 2024 10:30 AM
‘त्यांचं वय झालंय, बुड्ढा सठिया गया’, एकनाथ खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा झाला? पोलिसांनी सांगितलं…