लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू रवींद्र बेर्डे यांचं निधन, अनेक वर्षापासून ‘या’ आजारानं त्रस्त

| Updated on: Dec 13, 2023 | 10:57 AM

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना घशाच्या कर्करोगाने ग्रासले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांना रूग्णालयातून घरी आणले होते

मुंबई, १३ डिसेंबर २०२३ : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू आणि ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना घशाच्या कर्करोगाने ग्रासले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांना रूग्णालयातून घरी आणले होते, मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. रवींद्र बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपटात एकत्र अभिनय केला होता. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. तर रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान 1995 मध्ये रवींद्र बेर्डे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचार केलयानंतर 2011 मध्ये रवींद्र बेर्डे यांना कर्करोगाचं निदान झाल्याची माहिती मिळतेय.

Published on: Dec 13, 2023 10:57 AM
ललित पाटील प्रकरणाची चर्चा अधिवेशनात…फडणवीस म्हणाले, संजीव ठाकूर चुकले पण…
देवेंद्र फडणवीस यांचं अर्थ खातं कसं मिळवलं?; अजितदादा यांचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट