मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, ब्राम्हण वाद विकोपाला? धमकीवर काय म्हणाले भुजबळ…?
VIDEO | ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन...मंत्री छगन भुजबळ यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर ते म्हणाले, 'हे चालूच...'
नाशिक, २१ ऑगस्ट २०२३ | ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला आहे. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर धमकीचा फोन आला आहे. भुजबळांकडून नाशिक पोलीस आयुक्तांकडे आलेल्या फोन संदर्भात माहिती देण्यात आली. याप्रकरणी नाशिक पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. या धमकी प्रकरणावर स्वतः छगन भुजबळ यांना विचारले असता ‘हे चालूच राहते अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही तुम्हीही घाबरू नका’ अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतंच शिक्षण मर्यादित होतं.’, असे छगन भुजबळ म्हणाले. तर ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असं सांगतानाच काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते. आम्हाला मात्र, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले केली आहेत, असेही पुढे छगन भुजबळ म्हणाले होते.