मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भुजबळ यांना धमकीचा फोन; म्हणाले, ‘मी कोणत्याही…’
VIDEO | ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन, धमकीच्या फोनवर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, मी कोणत्याही धमक्यांना भीक...
नाशिक, २२ ऑगस्ट २०२३ | ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला आहे. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल आणि ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर धमकीचा फोन आला आहे. या धमकी प्रकरणावर स्वतः छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, मी अशा कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही. ब्राह्मण अतिशय घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. शिवीगाळ, धमकी देणाऱ्याला ब्राह्मण कसं म्हणायचं? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. ‘शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतंच शिक्षण मर्यादित होतं.’, असे छगन भुजबळ म्हणाले. तर ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असं सांगतानाच काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते. आम्हाला मात्र, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले केली आहेत, असेही पुढे छगन भुजबळ म्हणाले होते.