त्यांना भरभरून दिलं पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा… केंद्रीय अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची खोचक टीका

| Updated on: Jul 23, 2024 | 3:33 PM

बजेट मध्ये बिहार आणि आंध्रप्रदेश या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे. टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य… महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल, असंही वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

Published on: Jul 23, 2024 03:33 PM