निवडणूक आयोग भाजप खिशात घेऊन फिरते, कोणत्या नेत्यानं केला थेट आरोप?
VIDEO | अजित पवार गटाला निवडणूक चिन्ह मिळणार का? असा सवाल केला असता, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर सडकून टीका, भाजपवर निशाणा साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले, 'निवडणूक आयोग भाजपच्या खिशात आहे. जो भाजपसोबत जाईल त्यांना सर्व दिलं जात आहे. '
नागपूर, ३० सप्टेंबर २०२३ | ‘केंद्रीय निवडणूक आयोग हे भाजपच्या खिशात आहे. त्यामुळे भाजपसोबत जाणाऱ्या गटाला पक्ष आणि चिन्ह सहज मिळणार’, असे मोठं विधान राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. अजित पवार गटाला निवडणूक चिन्ह मिळेल काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक आयोग भाजपच्या खिशात घेऊन फिरत आहे. जो भाजपसोबत जाईल त्यांना सर्व दिलं जात आहे. उद्या दोन आमदार फुटले तरी त्या दोन आमदारांनाही चिन्ह दिलं जाईल. कारण निवडणूक आयोग त्यांच्या खिशात आहे, देश हुकूमशाहीप्रमाणे चालला आहे. मनमानी सुरूये, त्यामुळे कोणीही काहीही करू शकतो, असा हल्लाच त्यांनी चढवला. बघा नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
Published on: Sep 30, 2023 03:03 PM