Special Report | निर्बधांवरून सरकारला घरचा आहेर!-TV9

| Updated on: Jan 12, 2022 | 8:49 PM

राज्यातल्या निर्बंधावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती, त्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. पर्यनस्थाळी असलेल्या निर्बंधांवरून नेत्यांनी सवाल उपस्थित केले आहे.

राज्यातल्या निर्बंधावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती, त्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. पर्यनस्थाळी असलेल्या निर्बंधांवरून नेत्यांनी सवाल उपस्थित केले आहे. राज्यातली रुग्णसंख्या कमी झाली की निर्बंध शिथील करता येतील. सध्या रुग्णसंख्येतील वाढ मोठी आहे त्यामुळे निर्बंध घालणे गरजेचे आहे, असेही टोपे म्हणाले आहे. आज आपण संपूर्ण बंद नाही केलं, काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन बंद केल्याचे टोपे यांनी सांगितलं. राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहे, त्यामुळे पर्यटनस्थळी काम करणाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पर्यटनावर अनेकांचे पोटपाणी अबलंबून आहे, पुन्हा पर्यटनस्थळे बंद झाल्याने या वर्गातूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.

Goa Election | गोव्यातल्या निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीस-संजय राऊत आमनेसामने; ऐका, काय म्हणतायत…
Special Report | संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज!-TV9