गणपत गायकवाड प्रकरणी ‘ही’ मागणी घेऊन शिंदेंचे 7 मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ७ मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली.
मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४ : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ७ मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. या मंत्र्यांमध्ये शंभूराज देसाई, दादा भुसे, संदीपान भुमरे, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, शिंदे गटातील या सर्व मंत्र्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केल्यानंतर भाजप पक्षाकडून गणपत गायकवाड यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येते? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.