नीलम गोऱ्हे यांनी बोलावली महत्वपूर्ण बैठक; सरकारमधील मंत्री, उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मंत्री दीपक केसरकर आणि अन्य विधिमंडळ सदस्य तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पाहा व्हीडिओ...
मुंबई : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. मराठी भाषा भवनासंदर्भात ही बैठक बोलावण्यात आली आहे. मंत्री दीपक केसरकर आणि अन्य विधिमंडळ सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मागच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यात वाद झाला होता. उपसभापतींच्या दालनात हा वाद झाला होता. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीबद्दल दीपक केसरकर यांना सुनावलं होतं. यावेळी दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं. या वादानंतर उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर मराठी भाषा भवनासंदर्भातील आयोजित बैठकीत पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत.
Published on: Mar 23, 2023 11:03 AM