विधान परिषद: मतदानासाठी आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून रवाना होणार

| Updated on: Jun 20, 2022 | 10:03 AM

परंतु निवडणुकीचं गांभीर्य लक्षात घेत त्यांनी मतदानाला उपस्थित राहायचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणूक मतदानासाठी देखील आमदार जगताप हे मुंबईला रुग्नवाहिकेमधून मतदान करण्यासाठी गेले होते.

पिंपरी चिंचवड: विधानपरिषदेची निवडणूक काहीच तासांवर येऊन ठेपलीये.या निवडणुकी (Election)साठी पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad) मधील भाजपचे आमदार लक्ष्मण (BJP MLA Lakshman Jagtap)जगताप काही वेळात मुंबईकडे रवाना होणार आहेत. विधानपरिषद निवडणूक मतदानासाठी ते मुंबईच्या दिशेने सुसज्ज अशा रुग्नवाहिकेतून रवाना होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार लक्ष्मण जगताप हे आजरग्रस्त आहेत. परंतु निवडणुकीचं गांभीर्य लक्षात घेत त्यांनी मतदानाला उपस्थित राहायचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणूक मतदानासाठी देखील आमदार जगताप हे मुंबईला रुग्नवाहिकेमधून मतदान करण्यासाठी गेले होते. “त्यांची तब्येत बरोबर नसेल तर तुम्ही नाही आलात तरी चालेल” असं वक्तव्य आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटलंय. काय म्हणालेत त्या याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

 

 

Published on: Jun 20, 2022 10:01 AM
मित्रासाठी स्टिअरिंग हातात घ्यायला काही हरकत नाही- रोहित पवार
Sanjay Raut | तिन्ही पक्ष एकजूट आहेत ते निकालानंतर कळेल – संजय राऊत