मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचे काम शरद पवार करीत आहेत. हे मराठा समाजाने वेळीच ओळखलं पाहिजे, असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे, असे पत्र मनोज जरांगे पाटील आणि सरकारला द्यावे, असे सदाभाऊ खोतांनी चॅलेंज दिले आहे.
निवडणुकीत मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रेड्यांना फोडण्यासाठी चाबुक खांद्यावर घेणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले असून मविआ नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले. अनेक योजना आणल्या. पण महाविकास आघाडीचे नेते सरकारवर टीका करतात. पण येणाऱ्या निवडणुकीत या महाविकास आघाडीतील वळू, रेड्यानं चाबकाने फोडून काढू अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील रयत क्रांती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सदाभाऊ खोत यांनी मविआ आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. संजय राऊत नावाचा एक घरकोंबडा दररोज आरोळी देतो, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राऊतांवरही निशाणा साधला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील वळूंना आणि रेड्यानं चाबकाने फोडून काढणार आहे, असा थेट इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.