दबक्या पावलानं आला अन् काही कळण्याच्या आत त्याने कुत्र्याला… पाहा CCTV फुटेज

| Updated on: Jul 09, 2024 | 1:45 PM

रत्नागिरीतील एका हॉटेलमध्ये चक्क एका बिबट्याने एन्ट्री घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. हॉटेलमध्ये शिरणारा हा बिबट्या हॉटेलमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पाहायला मिळत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे थरारक प्रकार

रत्नागिरीमधून एक बातमी समोर आली आहे. रत्नागिरीतील एका हॉटेलमध्ये चक्क एका बिबट्याने एन्ट्री घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. हॉटेलमध्ये शिरणारा हा बिबट्या हॉटेलमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीमधील साखरपा येथील सह्याद्री हॉटेल येथील ही घटना असून सध्या परिसरात याच घटनेची चर्चा होताना दिसते. मध्यरात्री दबक्या पावलाने बिबट्याने रत्नागिरीमधील साखरपा येथील सह्याद्री हॉटेलमध्ये येवून कुत्र्याला लक्ष्य केलं. हाच थरारक प्रकार आणि बिबट्याची कुत्र्यावरची झडप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी बिबट्याने केवळ कुत्र्यावर झडप घातली नाही तर कुत्र्याला तोंडात पकडून नेल्याचा व्हिडीओ सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बघा हॉटेलमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला थरारक व्हिडीओ…

Published on: Jul 09, 2024 01:45 PM
सह्याद्रीच्या डोंगररांगा, वळणदार रस्ता अन् गगनबावडाचं पावसाळ्यात खुललेलं सौंदर्य, बघा ड्रोन शॉट
आंबोली घाटातील धबधब्याचं रौद्ररुप तुम्ही पाहिलं का?, रस्त्याची झाली नदी अन्…