तुझ्या पंढरपूरच्या पूजेला देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून येऊ दे! औरंगाबादेत पोस्टरबाजी

| Updated on: Jun 23, 2022 | 1:11 PM

या व्हिडिओत एक बॅनर दिसतोय, ज्या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकात हा बॅनर लावण्यात आलाय

औरंगाबाद: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. त्यांच्यासोबत 47 आमदारांनीही बंड केलं. मुख्यमंत्र्यांची खुर्चीच अडचणीत आली. या सगळ्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान औरंबादेतून एक व्हिडीओ (Aurangabad Viral Video) समोर येतोय ज्या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करण्यात आलीये. या व्हिडिओत एक बॅनर दिसतोय, ज्या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकात हा बॅनर लावण्यात आलाय ज्यावर,” हे माऊली तुझा कृपा आशीर्वाद राहू दे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ दे” असं लिहिण्यात आलंय.

दीपक केसरकरांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, गुवाहाटीमध्ये दाखल
VIDEO : Delhi Maharashtra Sadan Security | दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात