सार्वजनिक अपमान आणि… 21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
निवृत्त न्यायाधीशांनी काही लोकांकडून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिक अपमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही याबद्दल आमची सामान्य चिंता व्यक्त करतो, असे पत्रात म्हटले आहे
भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना २१ निवृत्त न्यायाधीशांनी पत्र लिहिले आहे. यामध्ये निवृत्त न्यायाधीशांनी काही लोकांकडून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिक अपमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही याबद्दल आमची सामान्य चिंता व्यक्त करतो, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, ही चिंतेची बाब असून या प्रकरणात लक्ष घालण्यात यावे, अशी मागणी देखील निवृत्त न्यायाधीशांनी केली आहे. या प्रकरणी २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहिले असून या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन तसेच उपाय योजना करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. निवृत्त न्यायमूर्तींनी कोणत्या घटनेबाबात सरन्यायाधीशांना हे पत्र लिहिले या बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर भ्रष्टाचारप्रकरणी काही विरोधी नेत्यांवर कारवाई करण्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिल्याचे म्हटले जात आहे.