VIDEO : Aditya Thackeray | कोरोना योद्ध्यांना तिसरा डोस देण्याचा विचार व्हावा, आदित्य ठाकरेंची मागणी

| Updated on: Dec 07, 2021 | 3:50 PM

देशात आणि राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे अनेक रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे किमान प्राथमिकतेनुसार कोरोनायोद्ध्यांना तरी तिसरा डोस द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

देशात आणि राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे अनेक रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे किमान प्राथमिकतेनुसार कोरोनायोद्ध्यांना तरी तिसरा डोस द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. आता राज्यात 18 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे, मात्र लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे विचारात घेऊन लसीकरणाची वयोमर्यादा 18 वरून 15 वर्षे करावी अशी मागणी आदित्या ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. 18 वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या मुलामध्ये जास्त फरक नसतो, त्यामुळे त्यांना लस देणे सुरक्षित आणि सोयीचे असल्याचं आदित्य ठाकरे यांचं म्हणणे आहे.

VIDEO : Sameer Wankhede | समीर वानखेडेंची आत्या यांची मलिकांविरोधात तक्रार दाखल
Breaking | ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून पदाचा गैरवापर, कुणाल राऊतांनी भाजपचे आरोप फेटाळले