विरोधी पक्षाच्या खासदारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र, काय आहे कारण?
VIDEO | विरोधी पक्षाच्या खासदारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र, काय केली पत्राद्वारे मागणी?
मुंबई : विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याची तक्रार केली आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असताना ट्रोलर्सकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचा यामध्ये नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. यादरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही निरीक्षणे नोंदविली होती. याबाबत महाराष्ट्रातील सध्या सत्तेत असलेल्या सरकारच्या समर्थकांनी आणि सोशल मीडियाच्या ट्रोलर्सनी सर्वोच्च न्यायालयाचा आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा थेट अवमान केल्याची तक्रार या विरोधी पक्षांच्या खासदारांनी राष्ट्रपतींना पत्राद्वारे केली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, समाजवादीचे खासदार जया बच्चन, आपचे राघव चड्डा यासह इतर खासदारांचा सहभाग आहे. इतकेच नाहीतर या ट्रोलर्सवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणीही यांनी केली आहे.