Special Report | संजय राऊतांचा भाजपावर लेटर बॉम्ब

| Updated on: Feb 10, 2022 | 12:14 AM

ईडीकडून निकटवर्तीयांची होणारी चौकशी आणि भाजप नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्रं लिहलं आहे. या पत्रात त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.

नवी दिल्ली: ईडीकडून निकटवर्तीयांची (ED) होणारी चौकशी आणि भाजप नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (venkaiah naidu) यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करण्याची गळ काही लोकांनी मला  घातली होती. मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी ते माझा वापर करणार होते. पण मी त्याला नकार दिला. तेव्हा त्यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. तुमचाही लालूप्रसाद यादव करू अशी मला धमकी देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी या पत्रात केला आहे. संजय राऊत यांच्या या पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे.

Special Report | ‘अल्ला हूँ अकबर’ची घोषणा देणाऱ्या मुस्कानला 5 लाखांचे बक्षीस
महागाईची तीन बोटं तुमच्याकडे निर्देश करतात, सामनातून भाजपवर टीका