सिंह कधी गिधाडांना घाबरत नाही, Devendra Fadnavis यांचा ShivSena ला टोला

| Updated on: Feb 09, 2022 | 3:34 PM

शिवसेना नेते संजय राऊत  (sanjay raut) यांनी मुंबईचा दादा शिवसेनाच (shiv sena) असल्याचं विधान केलं. तसेच आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पलटवार केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत  (sanjay raut) यांनी मुंबईचा दादा शिवसेनाच (shiv sena) असल्याचं विधान केलं. तसेच आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पलटवार केला आहे. शेर कभी गिदड धमकी से डरा नही करते, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. रोज सकाळी येऊन ते मनोरंजन करत असतात. संपादक असल्याने चर्चेत राहण्यासाठी काय विधाने केली पाहिजे हे त्यांना माहीत आहे, असं सांगतानाच राऊत यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन म्हणणं मांडावं, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी काय करते हे ईडी सांगेल. ते का करतात तेही ईडी सांगेल. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जे वक्तव्य आहे तो व्हिक्टिम कार्डचा एक भाग आहे. त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन मांडावं, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Published on: Feb 09, 2022 02:15 PM
VIDEO : 25 लोकं ही Congress च्या आंदोलनात जमले नाही – Anil Bonde
Ravi Rana यांच्या समर्थकांचं महापालिकेत आंदोलन, आयुक्त आष्टीकर यांच्याकर शाईफेक केली