शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 च्या हाती
लोकसभा निवडणुकांसंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी टीव्ही ९ मराठीच्या हाती लागली आहे. बघा कोण आहेत शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार ?
मुंबई, १८ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकांसंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी टीव्ही ९ मराठीच्या हाती लागली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या सोबत जाणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासोबत अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय. बीड लोकसभा मतदारसंघातून विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांचं नाव चर्चेत असून वर्ध्यातून नितेश कराळे मास्तर यांच्या नावाचीही चर्चा रंगताना दिसतेय. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. बघा कोण आहेत शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार ?