Tv9Podcast | 100 जणांची हत्या, 40 पेक्षाही जास्त टॅक्सी चालकांना मारुन मगरींना खाऊ घालणारा डॉक्टर

| Updated on: Sep 12, 2021 | 5:34 PM

डॉक्टरांना आपण देव मानतो. पण काही डॉक्टर त्याला अपवाद असतात. ते निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे असतात. आम्ही आज तुम्हाला अशाच एका डॉक्टराची माहिती देणार आहोत. या डॉक्टरने गुन्हेगारीची तर परिसीमा गाठली होती.

डॉक्टरांना आपण देव मानतो. पण काही डॉक्टर त्याला अपवाद असतात. ते निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे असतात. आम्ही आज तुम्हाला अशाच एका डॉक्टराची माहिती देणार आहोत. या डॉक्टरने गुन्हेगारीची तर परिसीमा गाठली होती. त्याने एक-दोन नाही तर जवळपास 100 जणांची हत्या केली आहे. सध्या हा डॉक्टर जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. या डॉक्टरने 40 पेक्षा जास्त टॅक्सीचालकांची हत्या त्यांचा मृतदेह मगरांना खाऊ घातला आहे. आरोपी डॉक्टरने स्वत: याबाबत कबुली दिली आहे. या डॉक्टरचं देवेंद्र शर्मा असं नाव आहे.

डॉक्टर देवेंद्र शर्मा हा मुळचा उत्तर प्रदेशच्या अलिगढ जिल्ह्यातील पुरेनी गावता. तो गेल्या 16 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मध्यंतरी त्याला पेरोलवर काही दिवसांची सुट्टी मिळाली होती. पण त्यानंतर तो परत आला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला दिल्लीतून बेड्या ठोकल्या होत्या.

Bhupendra Patel | भुपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री
Nanded | पेठवडज मध्यम प्रकल्पाचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांनी फोडला हंबरडा