tv9Podcast | आई-वडील, पत्नी-मुलांसह घरातील 14 जणांची हत्या, काळरात्र ठरली

| Updated on: Aug 27, 2021 | 2:28 PM

वारेकर कुटुंबासाठी 28 फेब्रुवारी 2016 ची मध्यरात्र भयावह ठरली. हसनैनने शीतपेयातून सर्वांना गुंगीचं औषध दिलं. घरातील सर्वांची शुद्ध हरपल्यानंतर रात्री एकामागून एक मोठ्या चाकूने त्याने सगळ्यांचे गळे कापले होते.

28 फेब्रुवारी 2016 ची रात्र ठाण्याच्या वारेकर कुटुंबासाठी काळरात्र (2016 Thane stabbing) ठरली. कारण एकाच घरात तब्बल 15 मृतदेहांची रास पडली होती. आई, वडील, पत्नी, पोटची मुलं, बहिणी यांच्यासह कुटुंबातील तब्बल 14 जणांची हत्या करुन ठाण्याच्या 35 वर्षीय हसनैन अन्वर वारेकर (Husnain Warekar) याने आत्महत्या केली होती. 7 लहान मुलं, 6 महिला आणि एका पुरुषाचा याच समावेश होता. रात्री कुटुंबातील सर्वांना बेशुद्ध करुन, प्रत्येकाच गळे चिरुन हसनैनने हे सामूहिक हत्याकांड केलं होतं. त्यानंतर त्याने स्वतःचंही आयुष्य संपवलं.

कॉमर्स पदवीधर असलेला हसनैन नवी मुंबईतील सीए फर्ममध्ये आयकर संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होता. त्याने त्याच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. तो जवळपास 67 लाख रुपयांच्या कर्जाच्या डोंगराखाली दबला गेला होता. तो शेअर ट्रेडिंगही करायचा आणि त्यातही त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बोललं जायचं. तर वारेकर कुटुंबात मालमत्तेवरुन वाद असल्याचीही त्यावेळी चर्चा होती.

Narayan Rane LIVE | दरोडेखोराप्रमाणे मला अटक, टप्प्याटप्प्याने प्रकरणं बाहेर काढणार : नारायण राणे
Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड 15 मिनिटे चर्चा