इंडिया टुडे सी व्होटरनुसार राज्यात ‘मविआ’ ‘महायुती’ वर भारी! काय सांगतो सर्वे?

| Updated on: Aug 25, 2023 | 12:23 AM

VIDEO | पुढच्या वर्षी पुन्हा मोदी सरकार येणार राज्यात महाविकास आघाडीला २८ तर महायुतीला २० जागा मिळणार तर एनडीएला ३०६ जागांचा अंदाज आहे, तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला १९३ जागांचा अंदाज

मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ | इंडिया टुडे सी व्होटरनुसार राज्यात ‘मविआ’ ‘महायुती’वर भारी पडणार आहे. राज्यात महाविकास आघाडीला २८ तर महायुतीला २० जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढच्या वर्षी पुन्हा मोदी सरकार येणार, असा अंदाज इंडिया टुडे सी व्होटरनुसार वर्तविण्यात आला आहे. तर इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्वेनुसार एनडीएला ३०६ जागांचा अंदाज आहे, तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला १९३ जागांचा अंदाज असल्याचेही इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्वेनुसार समोर आले आहे. दरम्यान, इंडिया टुडे आणि सी व्होटरने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात NDA आणि I.N.D.I.A मधील मतांच्या टक्केवारीत दोन टक्के मतांचा फरक समोर आला आहे. देशातही निवडणुका झाल्या तर भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होऊ शकते, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

Published on: Aug 25, 2023 12:23 AM
IAS अधिकारी रमाकांत बिरादार यांना आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स, काय आहे प्रकरण?
संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत! राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय केला दावा?