Loksabha Election 2024 : महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?

| Updated on: May 01, 2024 | 4:17 PM

महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. महायुतीत जागावाटप झाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवासांपासून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह ठाणे, कल्याण आणि मुंबईतील काही जागांवर महायुतीतून उमेदवार जाहीर करण्यात झाले नव्हते. ते दोन दिवसात जाहीर झालेत

महायुतीचं लोकसभा निवडणुकीचं जागावाटप समोर आलं आहे. या महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपला सर्वाधिक २८ जागा या महायुतीच्या जागावाटपामध्ये मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे गटाला १५, अजित पवार गटाला ४ आणि रासपला १ जागा मिळाल्याचे समोर आले आहे. यासर्व जागा महायुतीत वाटप झाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवासांपासून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह ठाणे, कल्याण आणि मुंबईतील काही जागांवर महायुतीतून उमेदवार जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ज्या जागेवर उमेदवारांची घोषणा झाली नव्हती, त्या जागांवर महायुतीतील वरिष्ठांनी उमेदवारांची नावे जाहीर करून लोकसभेचं जागावाटप पूर्ण केले आहे. बघा महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा मिळाल्या?

Published on: May 01, 2024 04:17 PM
नाशिकसाठी हेमंत गोडसेंना लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
म्हणून मी शिवसेना सोडली, बाळासाहेबांना लिहिलेल्या 7 पानी पत्रात राणेंनी काय म्हटलं?