शिंदेंना इंग्रजी येतं का? ‘त्या’ खोचक टीकेनंतर कुणी काढलं मुख्यमंत्र्यांचं इंग्रजी भाषेचं ज्ञान?

| Updated on: May 26, 2024 | 10:59 AM

मला कामचं करावी लागतात त्यामुळे मी काही लंडनला जावू शकत नाही, असं शिंदे म्हणाले. यानतंर इंग्रजी बोलता येत का? असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊतांनी बोचरा सवाल केला आहे. इतकंच नाहीतर लंडनला जायला इंग्रजी यायला लागतं तिकडे काय....

उद्धव ठाकरे सहकुटुंब लंडनला गेलेत. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. मला कामचं करावी लागतात त्यामुळे मी काही लंडनला जावू शकत नाही, असं शिंदे म्हणाले. यानतंर इंग्रजी बोलता येत का? असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊतांनी बोचरा सवाल केला आहे. इतकंच नाहीतर लंडनला जायला इंग्रजी यायला लागतं तिकडे काय मराठी, हिंदीत बोलणार का? असंही राऊतांनी म्हटले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासोबत संजय राऊत देखील लंडनला गेले आहेत. त्यामुळे सकाळची पत्रकार परिषद देखील बंद आहे. तर संजय राऊत नाही म्हटल्यावर त्यांचा मोर्चा राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी सांभाळला. बघा नेमकी काय केली मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका?

Published on: May 26, 2024 10:59 AM
येत्या ४ जूनला कोणाचं वारं वाहणार? मविआ की महायुती? मतदानाचे आकडे कुणाला साथ देणार?
उबाठाने केलेला ‘तो’ गेम गजानन कीर्तिकरांच्या अंगलट, येत्या 2 दिवसांत कारवाई? संजय शिरसाट म्हणाले…