अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, लोकसभेच्या निकालापूर्वीच झळकवले विजयाचे बॅनर

| Updated on: May 22, 2024 | 4:57 PM

मुंबईत 20 मे रोजी लोकसभेचं मतदान पार पडलं आहे. सर्व उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झालेले असताना मावळ तालुक्यातील उर्से टोल नाक्यावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार राहुल शेवाळे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची खासदारपदी बहुमताने निवड झाल्याचे बॅनर आता झळकू लागले आहेत

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील मावळ तालुक्यातील उर्से टोल नाक्यावर निकालापूर्वीच श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. उर्से टोल नाक्यावर श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांची खासदार पदी निवड झाल्याच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकवळे आहेत. मुंबईत 20 मे रोजी लोकसभेचं मतदान पार पडलं आहे. सर्व उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झालेले असताना मावळ तालुक्यातील उर्से टोल नाक्यावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार राहुल शेवाळे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची खासदारपदी बहुमताने निवड झाल्याचे बॅनर आता झळकू लागले आहेत. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. मुंबईतील उमेदवारांचे अभिनंदनाचे बॅनर टोल नाक्यावर झळकू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र अनेक उमेदवारांचे निकालापूर्वीच अभिनंदनाचे बॅनर लावण्याचा जणू ट्रेंडच अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून आला असल्याचे सध्या पहायला मिळत आहे.

Published on: May 22, 2024 04:57 PM
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
BIG BREAKING : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी