सर्व्हेच्या आकड्यात घोळ, की नुसता कल्लोळ? सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जंगी घमासान

| Updated on: Jun 03, 2024 | 10:25 AM

सोशल मीडिया आणि विरोधकांनी सर्व्हेच्या आकड्यांवर आक्षेप घेतला आहे. ज्या राज्यात चार जागा आहेत त्या राज्यातून भाजप सहा जागांवर भाजप पुढे कसं? असा सवाल विरोधक करताय... अंदाजाच्या आकड्यांवरून नुसता गदारोळ सुरू झालाय. तर नेटकऱ्यांची सर्व्हेच्या आकड्यांवर शंका

सर्व्हेच्या आकड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच घमासान रंगलं आहे. सोशल मीडिया आणि विरोधकांनी सर्व्हेच्या आकड्यांवर आक्षेप घेतला आहे. ज्या राज्यात चार जागा आहेत त्या राज्यातून भाजप सहा जागांवर भाजप पुढे कसं? असा सवाल विरोधक करताय… अंदाजाच्या आकड्यांवरून नुसता गदारोळ सुरू झालाय. तर नेटकऱ्यांनी सर्व्हेच्या आकड्यांवर शंका व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे सर्व्हेच्या गणितावर विरोधकांनी सवाल केले आहेत. एका सर्व्हेनुसार, भाजप २० ते २२, काँग्रेस ३ ते ४, शिंदे गट ८ ते १०, ठाकरे गट ९ ते ११, अजित पवारांचा गट १ ते २ आणि शरद पवार यांचा गट ३ ते ५ जागा जिंकणार असा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये विशेषतः ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या जागांवर आक्षेप घेतला जात आहे. नेमका काय आहे विरोधक आणि नेटकऱ्यांचा आक्षेप बघा स्पेशल रिपोर्ट….

Published on: Jun 03, 2024 10:25 AM
Exit Poll 2024 : भाजप बोले तसे एक्झिट पोलचे आकडे, निकालापूर्वीच्या अंदाजावर कुणाची सडकून टीका?
महाराष्ट्राच्या 48 जागांचा अंदाज, कोण होणार तुमच्या जिल्ह्याचा खासदार? बघा संपूर्ण यादी