प्रचार थांबला उद्या मतदान, लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात ‘ठाकरे ब्रदर्स’मध्ये टीकेचा सामना

| Updated on: May 19, 2024 | 10:18 AM

सोमवारी मुंबईतील सहा जागांसह एकूण १३ मतदारसंघात पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, या शेवटच्या टप्प्यात ठाकरे बंधू आमने-सामने आलेत. प्रचार थांबण्यापूर्वी उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर चांगलेच तुटून पडलेत. शेवच्या दिवशीही महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार आपली ताकद लावली

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा अंतिम आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबलाय. आता सोमवारी मुंबईतील सहा जागांसह एकूण १३ मतदारसंघात पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, या शेवटच्या टप्प्यात ठाकरे बंधू आमने-सामने आलेत. प्रचार थांबण्यापूर्वी उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर चांगलेच तुटून पडलेत. शेवच्या दिवशीही महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार आपली ताकद लावली. प्रचार सभांसह रोड शो झाले. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या शाखांना भेटी दिल्या आणि मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. शेवटच्या टप्प्यातील मतदानात मुंबईकडे विशेष लक्ष आहे. कारण शेवटच्या टप्प्यातील मतदान हे उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात होत आहे. मुंबईतील सहा जागांवर महायुती आणि मविआमध्ये काँटे की टक्कर आहे, या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वीच ठाकरे ब्रदर्समध्ये चांगलाच सामना रंगला. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 19, 2024 10:17 AM
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पुन्हा पदस्पर्श दर्शन सुरु
भाजपच्या मिहीर कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् उद्धव ठाकरेंचा कडक इशारा