लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? अभिनेते प्रविण तरडे यांनी एका शब्दात सांगितलं

| Updated on: May 13, 2024 | 2:05 PM

अभिनेते प्रविण तरडे यांनी आज पुण्यात सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क बजावला, 'आज मतदान केंद्रावर ज्या रांगा लागल्यात, जी गर्दी झाली आहे ते पाहून मला पहिल्यांदा आनंद झालेला आहे. पहिल्यांदा खूप वेळ रांगेत उभे राहण आम्ही सेलिब्रेट केलं. पुण्याचे संस्कार आणि पुण्याची संस्कृती ही या रांगांमधून दिसली', असे तरडे म्हणाले

Follow us on

अभिनेते प्रविण तरडे यांनी आज पुण्यात सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत तरडे यांनी मतदान केलं. यावेळी प्रवीण तरडे यांनी पुणेकरांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. ते म्हणाले, आज मतदान केंद्रावर ज्या रांगा लागल्यात, जी गर्दी झाली आहे ते पाहून मला पहिल्यांदा आनंद झालेला आहे. पहिल्यांदा खूप वेळ रांगेत उभे राहण आम्ही सेलिब्रेट केलं. पुण्याचे संस्कार आणि पुण्याची संस्कृती ही या रांगांमधून दिसली. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात तरडे दिसले होते. यावर विचारले असता तरडे म्हणाले, मुरलीधर मोहोळ मावस माझा भाऊ आहे, नातेगोत्यातला माणूस जर उभा असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिला पाहिजे. त्यामुळे माझ्या शिकल्या सवरलेल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेलो.. तर ही लोकशाहीची निवडणूक आहे, माझ्या घरातला तुटलेला नळ त्या खासदाराने येऊन दुरुस्त करावा अशी माझी अपेक्षा नाही.. मी खासदार देशासाठी, देशांच्या सुरक्षित सीमांसाठी, देशातील उत्तम उत्तम कायद्यांसाठी निवडून देत असल्याचे तरडे यांनी सांगितले यावेळी त्यांनी निकाल काय लागणार ते थेट सांगितले.