मोदीच पुन्हा पंतप्रधान? अजित पवारांमुळे निकालाआधीच 10 जूनची तारीख चर्चेत, 10 जूनला होणार शपथविधी?
4 जूनला या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र अजित पवार यांच्या एका वक्तव्याने 10 जूनची तारीख चर्चेत आली आहे. तर निकालापूर्वीच 10 जूनची तारीख चर्चेत आल्याने शपथविधीचा मुहूर्त निघाला का? अशी चर्चा सुरू झाली आहे. बघा नेमकं काय म्हणाले अजित पवार?
लोकसभा निवडणुकीचा देशात आणखी एक टप्पा बाकी आहे. तर 4 जूनला या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र अजित पवार यांच्या एका वक्तव्याने 10 जूनची तारीख चर्चेत आली आहे. तर निकालापूर्वीच 10 जूनची तारीख चर्चेत आल्याने शपथविधीचा मुहूर्त निघाला का? अशी चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातच एनडीएला बहुमत मिळाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केला आहे. त्यातच अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोदी आणि एनडीएने 10 जूनला शपथविधी घेण्याचं काही ठरवलंय का? अशी चर्चा सुरू झाली. अजित पवार पक्षाच्या अधिवेशनाविषयी बोलत होते. पण दिल्लीत 10 जून रोजी काही घडलं तर पक्षाच्या अधिवेशन पुढे ढकललं जाईल, असं अजित पवार म्हणाले. बघा नेमकं काय म्हणाले अजित पवार?
Published on: May 28, 2024 10:59 AM