Exit Poll 2024 : भाजप बोले तसे एक्झिट पोलचे आकडे, निकालापूर्वीच्या अंदाजावर कुणाची सडकून टीका?

| Updated on: Jun 02, 2024 | 6:18 PM

टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार असून एनडीएला ३३७ जागा तर इंडिया आघाडीला १७० जागा मिळणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार असून एनडीएला ३३७ जागा तर इंडिया आघाडीला १७० जागा मिळणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा एक्झिट पोल भाजप सरकारचा सायकॉलॉजिकल वॉरफेयर आहे. भाजप यामध्ये माहिर आहे. हे इलेक्शन जनतेने आपल्या हातात घेतले आहेत.भारताच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांनी भरभरून मतं दिली आहेत. येणाऱ्या चार तारखेला आपल्याला हे दिसणारच आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली तर भारतामध्ये इंडिया अलायन्सची सरकार निश्चितच स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.