महाराष्ट्राच्या 48 जागांचा अंदाज, कोण होणार तुमच्या जिल्ह्याचा खासदार? बघा संपूर्ण यादी

| Updated on: Jun 03, 2024 | 10:45 AM

देशात झालेल्या सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जून रोजी लागणार... टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार असून एनडीएला 337 जागा तर इंडिया आघाडीला 170 जागा मिळणार?

देशात झालेल्या सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जून रोजी लागणार आहे. या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. अशातच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा TV9 पोलस्ट्रेटच्या सर्व्हे समोर आला आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार असून एनडीएला 337 जागा तर इंडिया आघाडीला 170 जागा मिळणार आहे. तर राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. या सर्व्हेमधून महाराष्ट्रात महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीचे घटकपक्ष भाजपला 18, शिंदे गटाला 4, अजितदादा गटाला 0 तर महाविकास आघाडीमधील पक्ष कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) 6 आणि ठाकरे गटाला 14 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 48 मतदारसंघांमध्ये विजयाची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार कोणते बघा….

Published on: Jun 03, 2024 10:45 AM
सर्व्हेच्या आकड्यात घोळ, की नुसता कल्लोळ? सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जंगी घमासान
बस अजून थोडेच दिवस… ‘या’ तारखेला पाऊस महाराष्ट्रात येणार; Monsoon संबंधित हवामान विभागाची मोठी अपडेट