घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्… , ठाकरेंचा शिंदे-पवार-फडणवीसांवर घणाघात
'त्यांना झोपेतही घोडेबाजार दिसतो. पण त्यांना सांगायला हवं होतं. हे रेसकोर्समधले घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घेतलं ते घोडे नाहीतर खेचरं आहेत. गाढवं आहेत ओझी वाहणारे. खरे घोडे हे अश्मेध आणि रथाचे असतात', उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांवर खोचक टीका
पुण्यातून उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाली. तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलं ती गाढवं आहेत, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटावर टीका केली. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील पुन्हा खोचक टीका केल्याचे दिसून आले. ‘काल पुण्यात सभा झाली. ठिकाण योग्य होतं. कारण त्यांना झोपेतही घोडेबाजार दिसतो. पण त्यांना सांगायला हवं होतं. हे रेसकोर्समधले घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घेतलं ते घोडे नाहीतर खेचरं आहेत. गाढवं आहेत ओझी वाहणारे. खरे घोडे हे अश्मेध आणि रथाचे असतात.’, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. यावेळी टरबूजाला घोडा नाही लागत तर हातगाडी लागते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली. बघा काय म्हणाले उद्धव ठाकरे?