ऐ थांब जरा…. राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
शिवाजी पार्क येथील बालमोहन शाळा येथील मतदान केंद्रावर दाखल होत त्यांनी मतदान केले. या मतदानानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते पत्रकारांवर थोडे चिडल्याचे पाहायला मिळाले तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला राज ठाकरेंनी खास आपल्या स्टाईने उत्तर दिलीत
देशात आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. शिवाजी पार्क येथील बालमोहन शाळा येथील मतदान केंद्रावर दाखल होत त्यांनी मतदान केले. या मतदानानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते पत्रकारांवर थोडे चिडल्याचे पाहायला मिळाले तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला राज ठाकरेंनी खास आपल्या स्टाईने उत्तर दिली आहेत. तर यावेळी मुंबईकरांना काय आवाहन कराल? असा सवाल केला असता ते म्हणाले, “तेच ते आपलं घीसापीटा वाक्य, मतदानाचा हक्क बजावा. तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील. ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालाय, असा तरुण वर्ग मतदानाला येईल. काहींच्या आशा संपल्या आहेत, त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षाच करु नका”
Published on: May 20, 2024 05:16 PM